पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेत आता परिवर्नतन होणार, राष्ट्रवादीचाच खासदार होणार, असा पार्थ पवार यांच्या विजयाचा निर्धार राष्ट्रवादीच्या शिलेदारांकडून पिंपरीत करण्यात आला.

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी मार्केट, पिंपरी कॅम्प येथे अाज प्रचार करण्यात आला. नागरिक, व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन राष्ट्रवादीचे विचार पोहचविण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवानी,नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे, नगरसेविका निकिता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे,श्रीमती माधुरी मूलचंदनी, हरिष बोधानी, हरिष आसवानी, माजी उपमहापौर जगनाथ साबळे, माजी नगरसेवक गुरुबक्ष पहिलानी, रामआधार धारिया, अर्जुन कदम, श्रीरंग शिंदे, हनुमंत नेवाळे तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group