पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेवर पुन्हा भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिवशाही व्यापारीसंघाचे पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी विधानसभेतून शिवशाही व्यापारीसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटीगाठींना सुरूवात केली आहे.
शिवशाही व्यापारीसंघाने शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. त्यानुसार मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात शिवशाही व्यापारीसंघाचे पदाधिकारी उतरले आहेत. पिंपरी विधानसभेतून मतदार राजाच्या भेटीगाठींंना शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात करण्यात आली. पिंपरी बाजार पेठेतील दुकानदार, तसेच व्यावसायिकांच्या भेटी घेऊन बारणे यांनाच मतदान करावे असे साकडे घालण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, प्रदेश सदस्य मारूती मस्के, भरत इंगळे, खंडु शिरसाठ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group