पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पकडून भोसरी पोलिसांनी ४ लाख १० हजार रुपये किंमतीचा २७ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई भोसरी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास केली.
या प्रकरणी मतीन मेहबूब शेख (वय २६, बालीक आश्रम रस्ता, लेंडकर मळा, अहमदनगर) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास एकजण गांजा विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती पोलीस हवालदार रासकर आणि देवकर यांना मिळाली. त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे, देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपी शेख याच्याकडून २७ किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे.






















Join Our Whatsapp Group