पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४१.०३ टक्के एवढे मतदान झाले आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात ही प्रमुख लढत होत आहे.
उन्हाचा कडाखा लक्षात घेता सकाळच्या सत्रात बऱ्यापैंकी मतदान झाले. दुपारी १२ वाजल्यानंतर मतदारांची संख्या काही प्रमाणात कमी झाली होती. आता दुपारी तीन वाजल्यानंतर हळू मतदार पुन्हा घरातून बाहेर पडू लागले आहेत. मावळमध्ये सुमारे ६० टक्क्यापर्यंत मतदान होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पनवेल – ४०.०९%
कर्जत – ४४.०६%
उरण – ४२.५१%
मावळ – ४१.७३%
चिंचवड – ४१.३४%
पिंपरी – ३७.८१%
मावळ मतदारसंघात एकूण मतदार : २२ लाख २७ हजार १३३, पुरुष मतदार : ११ लाख ६५ हजार ७८८, महिला मतदार : १० लाख ६१ हजार ३१३, इतर मतदार ३२, एकूण मतदान केंद्रे २५०४, मतदान यंत्रे : २५०४, एकूण कर्मचारी : १२ हजार ६५९, संवेदनशिल केंद्र ८३