पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५१.३५ टक्के एवढे मतदान झाले आहे. तर शिरूर लोकसभेमध्ये ५१.२५ टक्के एवढे मतदान झाले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात ही प्रमुख लढत होत आहे. तर शिरूरमध्ये महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय टक्केवारी
पनवेल – ४९.०३%
कर्जत – ५८.०९%
उरण – ५७.०२%
मावळ – ५३.०६%
चिंचवड – ४८.६५%
पिंपरी – ४५.०८%
शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय टक्केवारी
जुन्नर – ५८.१८%
आंबेगाव – ५९.६१%
खेड – ५१.०९%
शिरूर – ५२.०६%
भोसरी – ५०.०६%
हडपसर – ४१.०३%