पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांच्या मातोश्री इंदुबाई विठोबा लांडे यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी आज मतदानाचा हक्क बजावला.
भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात इंदुबाई लांडे यांनी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे, माजी महापौर मोहिनीताई लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, उद्योजक सुधीर मुंगसे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group