पुणे (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वळणे गावात दुर्दैवी घटना घडली. सहलीसाठी आलेल्यांमधील तिघेजण धरणात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुळशी तालुक्यातील वळणे गावात ही घटना घडली. संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिवकुमार अशी धरणात बुडालेल्यांची नावे आहेत.
यातील एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दोन मुलांचा शोध सुरु आहे. सहलीचा आनंद लुटण्यासाठी आले असतानाच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक केली जात आहे.
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)