पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक येथे सुरु करण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली. पिंपळे सौदागर गावठाण येथून काटे वस्ती येथे जाण्यासाठी भुयारी मार्गाचेही काम येत्या काही दिवसात सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून गोविंद यशदा चौक हा ‘सिग्नल-फ्री’ चौक होणार असल्याचे शत्रुघ्न काटे म्हणाले.

गोविंद यशदा चौक येथील उड्डाणपुलाची एक बाजू (हिंजवडी ते भोसरी मार्ग) चे काम पुर्ण झाले असून नागरी वाहतुकीस सुरू करण्यात आले आहे. तसेच उड्डाणपुलाची दुसरी बाजूचे (भोसरी ते हिंजवडी) काम ही प्रगतीपथावर असून लवकरच ती बाजू ही वाहतुकीस खुली करण्यात येणार असल्याची माहिती शत्रुघ्न काटे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group