पिंपरी (Pclive7.com):- दाताची शत्रक्रिया करताना तरूणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे. निगडी, प्राधिकरण येथील स्टर्लिंग आयुर्वेदिक रूग्णालयात हा प्रकार घडला असून धनश्री जाधव (वय – २३, रा.नेरे, मारूंजी) असं या मृत्यू झालेल्या तरूणीचं नाव आहे. या प्रकरणी निगडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहेत.
धनश्रीला दीड वर्षांपासून दाताची समस्या होती. ती निगडी येथील स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून उपचार घेत होती. शस्त्रक्रियेसाठी ती आठ दिवसापासून रूग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरु असताना अतिरक्तस्राव झाल्याने धनश्रीची प्रकृती ढासळली होती. दरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला. याकडे डॉक्टरांनी गांभीर्याने न पाहिल्याने धनश्रीचा मृत्यू झाल्याची लेखी तक्रार आई वडिलांनी निगडी पोलिसांकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group