पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंचा पराभव निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असा विश्वास पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया उद्या सकाळी आठ वाजल्यापासून बालेवाडी येथे सुरू होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीच्या एक दिवस आधी संजोग वाघेरे पाटील यांनी मावळमधून पार्थ पवारच खासदार होणार असल्याचा दावा केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, उरण, कर्जत विधानसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना मोठी मताधिक्क्य मिळणार आहे. पनवेल आणि मावळ विधानसभा मतदारसंघातही पार्थ आघाडी घेणार आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळतील असा विश्वास व्यक्त करत पार्थ पवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचे ते म्हणाले.
पवार घराण्याचा पराभव माझ्याकडून होणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. त्याबाबत वाघेरे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी काय बोलावे हा त्यांचा विषय आहे. मावळ मतदारसंघातील लोकांचा बारणेंकडून भ्रमनिरास झाला आहे. तो भ्रमनिरास उफाळून आलेला आहे, त्याचे रूपांतर उद्या पार्थ पवार यांच्या विजयाने होईल असा दावा वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आहे.























Join Our Whatsapp Group