पिंपरी (Pclive7.com):- राज्यातच नव्हे तर देशात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर विधानसभेसाठी इचछुकांनी तयारी सुरू केली आहे. राखीव मतदारसंघ असलेल्या पिंपरीतून अनेकांनी तशी फिल्डींग सुरू केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज एक गुप्त बैठक झाली. त्यात आगामी पिंपरी विधानसभेच्या रिंगणात जनतेची व मातंग समाजाची प्रगती वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत असल्याचं चित्र सध्या युवराज दाखलेंच्या बाबतीत पहावयास मिळत आहे. युवराज दाखले म्हणजे सर्व समाज बांधवाना एकत्रितपणे आणून त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणारे नेतृत्व असून त्यांना सर्वांनी एकमुखी पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
या बैठकीला पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जोगदंड, मातंग एकता आंदोलनाचे सचिव सतीश भवाल, अखंड बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकिरण घटकार, रामकिशन माने, पप्पू परतापे, नितीन गायकवाड, अक्षय थोरात, मसू दोडके, बाळू दगडे, अंकुश सुकले, दीपक दुकले, अमोल तेलंगे, भीम वाळके, दीपक कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी, सोशल मीडियावरती युवराज दाखले यांनी भीमा कोरेगावच्या संदर्भांत कुठलीच भूमिका घेतली नाही, अशी टीका टिप्पणी करण्यात आली होती. भीमा कोरेगावच्या जातीय दंगलीमध्ये दोन्ही समाजाला शांत करण्याची भूमिका युवराज दाखले यांनी वेळोवेळी घेतली होती. मराठा मुक मोर्चा आंदोलनातील आक्रमक भूमिकेप्रमाणेच बाकीच्या अठरा पगड जातीसाठी सुध्दा युवराज दाखले अग्रस्थानी असल्याची सर्वांनी पाहिले आहे. भीमा कोरेगावच्या प्रकरणात ज्यावेळी सर्व स्वयंघोषित नेते घरात बसून तमाशा पाहत होते. त्यावेळी युवराज दाखले रस्त्यावर उतरून लोकांना शांत करत असल्याचे उघड्या डोळ्यांनी सर्व समाजाने बघितले आहे. म्हणूनच आमचं अगोदरच ठरलंय पिंपरी विधानसभेत फक्त युवराज दाखले यांनाच पाठिंबा द्यायचा असा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.






















Join Our Whatsapp Group