पिंपरी (Pclive7.com):- ग्रीन पांडा इनव्हायरो सिस्टिम मार्फत पिंपळे सौदागर येथील राधाईनगरी सोसायटीमध्ये १०२ फ्लॅट मधील ओल्या कचऱ्यापासुन ६० किलो क्षमता वजनी कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापु काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनानंतर बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागरची स्मार्ट सिटीसाठी करण्यात आलेली निवड या परिसरातील नागरिकांनी सतत आपल्या सहभागातून तसेच योगदान मार्फत योग्य ठरवली आहे. प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावत बरोबरीने ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केलेत. ओला कचरा या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच यातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांकडून महापालिकेला अमूल्य सहकार्य केले जात आहे. स्मार्ट सिटी ही फक्त पायाभूत सुविधेमुळे स्मार्ट होत नसते, तर ती सुविधा उपभोगणारी जनशक्ती सुद्धा स्मार्ट असावी लागते. आणि पिंपळे सौदागरवासियांनी हा स्मार्टपणा सतत सिद्ध करून दाखवला आहे.

पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यामध्ये कंपोस्ट खत प्रकल्प राबविण्यात आले आहे. तरी परिसरातील इतर सोसायटी आणि गृहनिर्माण संस्थानी देखील अश्याच पद्धतीने कंपोस्ट खत प्रकल्प राबवावे. तसेच यामध्ये तयार होणाऱ्या खताचा आपल्याच सोसायटी परिसरातील गार्डनमध्ये वापर करता येईल. एक लोकप्रतिनिधी या नात्याने कंपोस्ट खत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करत आहे.
यावेळी राधाईनगरी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन विवेक फलक, सेक्रेटरी डॉ. दिपाली गायकवाड, खजिनदार केतन शहा, पिंपळे सौदागर विभागाचे आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, ग्रीन पांडा इनव्हायरो सिस्टिमचे पार्टनर गणेश शिंदे, सौरभ पुरोहित, विजय देशपांडे, शंकर हांडे, उज्वल देशपांडे, संजय होने, पराग देशमुख, प्रतिभा शर्मा, संकेत गुप्ता, राहुल गायकवाड, रितु गायकवाड, कविता पानघंडी, संध्या पानघंडी, अपर्णा कुलकर्णी, वैशाली शहा, पौर्णिमा श्रॉफ, विजय श्रॉफ, प्रमोद कुलकर्णी, वसुंधरा देशपांडे, रूपाली जैन, सोनम जैन, रमेश काटे, किरण जैन, राहुल जैन, किशोर देशमुख, मोघल, संजय शेलार, मनोज खोटले, लातूरकर, प्रशांत सावंत, पंकज सावेकर व इतर सभासद उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group