पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपुर्व यश मिळाले. राष्ट्रवादीचा एकेकाळचा गड असलेल्या पिंपरी विधानसभेत मतदारांनी युतीच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे भाजपातील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपाचे युवा नेते, नगरसेवक शैलेश मोरे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी ‘पिंपरी विधानसभेत बदल घडणार.. शैलेश मोरे हेच आता आमदार होणार’..! अशी ‘टॅग लाईन’ वापरत वातावरण निर्मिती सुरू केली आहे.
पिंपरी विधानसभेत शैलेश मोरे यांचा मोठा परिवार आहे. त्यातील पिंपरी, दापोडी, कासारवाडी, आकुर्डी, प्राधिकरण या सर्वच भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मोरे हे नगरसेवक असले तरी प्रभागापुरतं मर्यादित काम करण्यापेक्षा त्यांनी नेहमीच शहराचा विचार अगोदर केला आहे. त्यांचे कार्य व काम करण्याची पद्धत वेगळी आहे.
पिंपरी विधानसभेला आमदार म्हणुन शैलेश मोरे यांची गरज आहे. कारण पिंपरी विधानसभेत उच्च व मध्यमवर्गीय नागरिक राहतात. उच्चभ्रू लोकांपासून ते झोपडीधारक नागरिकही या भागात राहतात. त्या सर्वांना सोबत घेऊन विकासकामे मोरे हे करू शकतात. कारण शैलेश मोरे यांनी कधीही गरीब-श्रीमंत आणि जातीविरहित लोकसेवा करण्याचेच काम अखंडपणे केले आहे. विधानसभेत काही जण फक्त जातीच्या कार्डावरच निवडणुका लढतात. त्यांना कुठल्याही विकासाचा अजेंडा नसतो किंवा सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छाशक्ती नसते. शैलेश मोरे हे एकमेव नेतृत्व असं आहे की त्यांचे सर्व मतदारसंघातील नागरिकांशी विश्वासाचे नातं आहे. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून शैलेश मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले समाजकार्य सुरू ठेवले आहे.
पिंपरीचा विकास हा चिंचवड व भोसरी विधानसभेच्या तुलनेत कमी प्रमाणात झालेला आहे. अनेक समस्या वर्षानुवर्षे आहे जैसे थे आहेत. त्यात आता बदल घडवायचा असेल तर आक्रमक व अभ्यासू आमदाराची गरज आहे. शैलेश मोरे यांचा अभ्यास व अनुभव पिंपरीचा सर्वांगीण विकास करू शकतो तर आताच वेळ आहे बदल घडविण्याची. युवा नेतृत्व शैलेश मोरे यांना आमदार करण्याची..!





















Join Our Whatsapp Group