पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन येथे आज सकाळी एक जखमी कोकीळा आपले प्राण वाचविण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. सुमारे ८ ते १० कावळ्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. दरम्यान युवासेनेचे पदाधिकारी तेथून जात होते. त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर तत्परतेने त्यांनी कोकीळेला पकडून तिच्यावर प्रथोमपचार केले.
पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड, सुनिल कदम यांनी त्या कोकीळेला जिवणदान दिले. त्यानंतर त्याला पक्षीमित्र हेमंत शेळके यांच्या स्वाधीन केले.






















Join Our Whatsapp Group