भोसरी (Pclive7.com):- भोसरी मतदारसंघात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. चार-चार तास वीज पुरवठा सुरळीत होत नाही. नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महावितरणच्या सर्व तक्रारींचे निराकरण करून वीज पुरवठा सुरळीत करा. अन्यथा शनिवारी भोसरी, बालाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला.
भोसरी मतदारसंघातील विजेच्या समस्या संदर्भात आज (बुधवारी) बैठक घेतली. त्यात दोन दिवसांत विजेच्या सर्व समस्या मार्गी लावण्याच्या सूचना लांडगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. महापौर राहुल जाधव, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नम्रता लोंढे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, भीमा बोबडे, दिनेश यादव उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group