पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आमदार लक्ष्मण जगताप किंवा आमदार बाळा भेगडे यांची वर्णी लागेल अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना होती. मात्र जिल्ह्यातील आमदार जगताप, भेगडे, लांडगे, पार्चेणे, कांबळे यांच्यापैकी कोणाचीही पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे जिल्ह्यातील १५ पैकी एकही आमदार पालकमंत्री पदासाठी लायक वाटला नाही का? म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरचे चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती केली आहे. हा तर सरळ सरळ पुणे जिल्ह्यातील मतदारांचाच अपमान केला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे.
यासंदर्भात मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती सत्ता होती. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरात आठ आमदार पिंपरी चिंचवड शहरात तीन तर जिल्ह्यात १५ आमदार भाजपसेना युतीचे निवडुण आले. लोकसभेत चारपैकी तीन खासदार भाजप सेनेचे निवडूण आले. महापालिका सार्वत्रिक निवडणूकीत आपण पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर घडवा. पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीमंडळात संधी देतो. असे सुतोवाच आपण केले होते. यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादीचा पाडावा करुन ७७ नगरसेवक कमळ चिन्हांवर निवडूण आणून भाजपाला एक हाती सत्ता मिळून दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजप सेनेचे पुणे व मावळमधून खासदार निवडूण आले.
सन २०१४ विधानसभा निवडणूकी पासून भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, महेश लांडगे यांच्या माध्यमांतून शहराला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. ही भाजपा आमदार व शहरवासींयाची अपेक्षा होती. जेष्ठनेते आझमभाई पानसरे ह्यांचे राजकीय पुर्न:वसन होईल. हे ही अपेक्षित होते. मात्र विधी मंडळाचा कार्यकाल संपत आला तरी या नेत्यांची मंत्री पदाबाबत पाटी कोरीच राहिली.
लोकसभा २०१९ मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी हा उपरा उमेदवार आहे. स्थानिक बाहेरचा मुद्दा करीत भाजप सेनेने प्रचार आणि प्रसार केला. निवडणूकीत खासदार श्रीरंग बारणे विजयी झाले. पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला. चिंचवड मतदार संघातून आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून दिले. तर मावळ विधानसभा मतदार संघातून आमदार बाळा भेगडे यांनी ही सेना उमेदावाराला मताधिक्य मिळवून दिले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट पुणे मतदार संघातून खासदार म्हणून निवडूण आले. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप किंवा आमदार बाळा भेगडे यांची पुणे जिल्हा पालकमंत्री म्हणून वर्णी लागेल. अशी आपेक्षा जगताप, भेगडे यांची तसेच शहरवाशियांची होती. मात्र जगताप, भेगडे, लांडगे, पार्चेने, कांबळे यांच्यापैकी कोणाचीही पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली नाही. आपल्याला पुणे जिल्ह्यातील १५ पैकी एकही आमदार पालकमंत्री पदासाठी लायक वाटला नाही. म्हणून आपण कोल्हापुरचे चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. हा सरळ सरळ पुणे जिल्ह्यातील मतदारांचाच अपमान आहे.
आमच्या पुणे जिल्ह्यातील स्वाभिमानी १५ आमदारांनीही यावर ‘ब्र-शब्द’ ही न उच्चारता आपली आज्ञा श्रीरावंदे मानून गप्प राहणे पसंत केले. ज्याना पार्थ पवार उपरे, बाहेरचे वाटत होते. त्यांनीही कोल्हापुरच्या पाटलांना मान्यता देत. आपल्या आज्ञेचे पालक केले आहे. त्यामुळे आपण आता तरी पुणे जिल्ह्यातील आपल्या या आज्ञाधारक आमदारांपैकी कोणालाही आगामी मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पद द्यावे अशी मागणी मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group