पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया देशाच्या दौऱ्यावर जाणार ऑस्ट्रेलियात ७ ते १० जुलै दरम्यान होणाऱ्या आशिया-पॅसिफिक शहराच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या परदेश दौऱ्यासाठी येणाऱ्या ४ लाख ८० हजार रुपयांच्या खर्चाच्या आयत्या वेळच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.
जागतिक दर्जाचे वक्ते नेटवर्किंगमधिल संधी तसेच कनिष्ठ व्यवसाय आखून शहरे गतिमान बनवणे शहरांची स्थिरता गतिशीलता नवनिर्माण करण्याची क्षमता याबद्दल परिषदेत मार्गदर्शन केले जाणार आहे. महानगर निर्मितीच्या अभ्यासाच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड शहराला याचा फायदा होणार आहे. परिपूर्ण विकासाचा टप्पा गाठत असलेल्या शहराचे प्रतिनिधित्व करणे, तसेच या संधीतून शहराला उपयोग करून देण्याबरोबरच नवीन पार्टनरशिप आणि समन्वय स्थापित करण्यासाठी या परिषदेत सहभागी होणे आवश्यक आहे. ७ ते १० जुलै दरम्यान ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन येथे आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत शंभर शहरांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या दौऱ्या करिता व्हिजा, विमान प्रवास, निवास, नाश्ता, भोजन, स्थानिक प्रवास व इतर खर्चासाठी निगडीतील मेसर्स व्हिजन हॉलिडेज या ठेकेदार संस्थेकडून सर्व नियोजन करण्यात येणार आहे. याकरिता येणाऱ्या ४ लाख ८० हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.






















Join Our Whatsapp Group