देहूरोड (Pclive7.com):- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपाचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१३) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली.

विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल असे जखमी झालेल्या भाजप नगरसेवकाच्या नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देहूरोड येथे पंडित नेहरू मंगल कार्यालयासमोर खंडेलवाल यांचे कार्यालय आहे. गुरुवारी सायंकाळी ते कार्यालयात होते. कार्यालयीन कामकाज उरकून सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते बाहेर पडत असताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली याची माहिती समोर येत आहे.
त्यानंतर त्यांना नजीकच्या पवना रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group