पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या चित्रपट सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रमेश परदेशी यांच्या सहकार्याने चित्रपट मनसेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यकारिणीमध्ये संघटना मनसे चित्रपट सेना संघटक प्रज्ञा पाटील, मनसे चित्रपट सेना उपसंघटक दत्ता घुले, तुकाराम शिंदे उपसंघटक, दीपक भालेराव उपसंघटक, प्रसाद खैरे उपसंघटक, शिवनाथ दिलपाक सचिव अशी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यापुढे चित्रपट क्षेत्रामध्ये कलाकार, तंत्रज्ञानापासून निर्माता पर्यंत जाणवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकारिणी वतीने प्रयत्न केले जातील. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जातील. याचबरोबर चित्रपट सेना ग्रहांमध्ये ही प्रेक्षकांना काही अडचणी असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याविरुद्ध आवाज उठवेल अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.