पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निर्मला कुटे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली.
सभापतीपदासाठी आज महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील दिवंगत महापौर कै.मधुकर पवळे सभागृहात ही निवडणूक पार पडली. सभापती पदासाठी कुटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
सभापती निवड झाल्यानंतर निर्मला कुटे यांचा सत्कार महापौर राहुल जाधव यांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, सुजाता पालांडे, उषा मुंढे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group