पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समितीच्या सभापतीपदी अश्विनी बोबडे यांची निवड झाल्याचे पिठासीन प्राधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त, रुबल अग्रवाल यांनी जाहीर केले. आज शुक्रवार दि.१४ रोजी विधी समितीसाठी आयोजित केलेली विशेष बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी ही निवड जाहीर केली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आज दुपारी विधी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी अश्विनी बोबडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
नवनिर्वाचीत विधी समितीच्या सभापती पदी अश्विनी बोबडे यांचे पिठासीन प्राधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त, रुबल अग्रवाल यांनी अभिनंदन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, मनोज लोणकर, नगरसचिव उल्हास जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर सभापती अश्विनी बोबडे यांचा सत्कार महापौर राहुल जाधव यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक भिमा बोबडे, नगरसेविका अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.