पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते यांच्यावर आरोप करणे म्हणजेच शिवसेना पक्षाची शिस्त भंग करणे बेताल आरोप करणाऱ्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष तथा विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी केली आहे.
याबाबत युवराज दाखले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, ‘ई-लर्निंग’ प्रकल्पाच्या निविदेवरून नगरसेवक सचिन भोसले यांनी स्वत:ची प्रसिध्दी मिळविण्यासाठी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावर ‘स्टंटबाजी’ करत असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. दुसऱ्याच्या सांगण्यावरून या नगरसेवक महोदयांनी हा उद्योग केला आहे.
गटनेते राहुल कलाटे हे आतिशय प्रामाणिकपणे व संयमी शिवसेनेची भूमिका महापालिकेत मांडत आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीवर पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिकांचा मनापासून विश्वास आहे. यांच्यापुढे शिवसेना गटनेते कलाटे यांच्या अर्थात शिवसेना पक्षाच्या विरोधाक भुमिका घ्यावयाची असल्यास सचिन भोसले यांनी आदी त्यांच्या शिवसेना नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्वजी ठाकरेसाहेब यांच्याकडे त्यांना बडतर्फ करण्यासाठी लेखी मागणी करणार असल्याचा इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group