मावळ (Pclive7.com):- मुंबई वरून पुण्याला येत असताना मुंबई-पुणे महामार्गावर अमरदेवी जवळ, मारुती झेन कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. कारमध्ये सीएनजी होते. शॉक सर्किट झाल्याने गाडीने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळतीयं. यात सुदैवाने कोणतीही जीवीतहाणी झाली नसली तरी कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कारमध्ये दोघे प्रवासी होते. गाडीला आग लागल्याचे समजताच त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. शेजारीच डीएडी आर्मी ऑफिसर मेस असल्याने त्वरित मिलिटरीचे जवान पुढे सरसावले आणि आग विझवली. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.






















Join Our Whatsapp Group