पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचा आज ५३ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. युवासेना पिंपरी विधानसभेच्या वतीने देखील दापोडीतील ५३ गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून पक्षाचा वर्धापनदिन साजरा कपण्यात आला.
शिवसेना पक्षच्या ५३ व्या वर्धापन दिनानिम्मित युवासेना पिंपरी विधानसभेच्या वतीने दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेतील ५३ गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी या विद्यार्थ्यांना ५३ रोपांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला युवती सेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, दक्षता समिती सदस्य रवि कोवे, प्राचार्य पतंगे सर, उप प्राचार्य घोडके मॅडम, पर्यवेक्षक जाधव सर, ऍड. अजित बोराडे, सनी कड, राहुल राठोड, रवी नगरकर, ओंकार जगदाळे, उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group