पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मोरवाडी येथे राजगिरा लाडूची ३०० पाकिटे आणि पिण्याच्या पाण्याची ३०० बॉटल वाटप करण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शहर आघाडीचे अध्यक्ष दिपक भोजने, युवा आघाडी अध्यक्ष महावीर काळे, मराठवाडा अध्यक्ष सुनिल बनसोडे, पुणे जिल्हा अध्यक्ष हिराकांत गाडेकर, महासचिव संजय नाईकवडे, शहर उपाध्यक्ष संजय कवितके, दादासाहेब कोपनर, सचिव संतोष पांढरे, सौ.रेणुका भोजने, मारूती वाघमोडे, ओम नाईकवडे, दत्ता माने व इतर समाज बांधव उपस्थित होते.