पिंपरी (Pclive7.com):- डांगेचौक येथे एका तरुणीवर भरदिवसा चाकूने सपासप वार करण्यात आले. ही खळबळजनक घटना बुधवारी (दि.२६) सकाळी दहाच्या सुमारास घडली. गौरी विठ्ठल माळी (वय २० ,रा. डांगे चौक) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास शांताराम शेटे (वय २१, रा. वाडा, खेड) याला अटक केली आहे.
जखमी तरुणी डांगे चौक येथील स्पंदन रुग्णालयात ‘रिसेप्शनिस्ट’ आहे. सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर येत असताना संशयीत आरोपी विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी विकासला ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.