पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना शाखा फुगेवाडी व युवासेना पिंपरी विधानसभेच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना अन्नदान देखील करण्यात आले.
यावेळी पिंपरी विधानसभेचे आमदार गौतम चाबुकस्वार, युवासेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, विभाग प्रमुख राजेश वाबळे, सनी कड, रवी नगरकर, अजित बोराडे, गोपाळ मोरे, प्रमोद गायकवाड, सुनील कदम, दत्ता कांबळे, जीवा हाके, राहुल पलांडे, विनय खमगळ, ओंकार जगदाळे, राहुल राठोड, अकील शेख शिव सैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन उपविभाग प्रमुख एकनाथ हाके यांनी केले होते.