पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे भाजपाचे प्रवक्ते असल्याचे स्टिकर्स राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेतील आयुक्तांच्या कार्यालयात लावून तीव्र आंदोलन केले. काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी आयुक्त हर्डीकर हे भाजपा कार्यालयात गेले होते. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज महापालिका भवनात हे आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे, जावेद शेख, विक्रांत लांडे, विनोद नढे, राहुल भोसले, पंकज भालेकर, राजू बनसोडे, प्रज्ञा खानोलकर आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली.