पिंपरी (Pclive7.com):- नुकतेच भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीबाबत शहर युवक काँग्रेसने आयुक्तांचा याबाबत निषेध करत त्यांना भाजपामध्ये जाहीर प्रवेश करण्याचा खोचक सल्ला दिला आहे. त्यांच्या या कृत्याबाबत त्यांनी शहरवासियांची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा असेही युवक काँग्रेसने पत्राद्वारे आयुक्तांना म्हटले आहे.
याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, एनएसयुआयचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भोसरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासिर चौधरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group