पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अल्पसंख्याक बांधवांच्या हक्कासाठी युवासेना पिंपरी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. अल्पसंख्याकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अारफत शेख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
यावेळी पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, युवा नेते सागर लांगे, उपविभाग संघटक सनी कड, युवासेना शाखाधिकारी ओंकार जगदाळे, राहुल राठोड, अजय पिल्ले उपस्थित होते.
शहरातील अल्पसंख्याकांना न्याय मिळावा यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हाजी आरफत शेख यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, अल्पसंख्याक युवकांना रोजगार सुरु करण्यासाठी शासकीय योजनेनुसार कर्ज मिळावे. यासाठी व व्यवसाय कर्ज मिळण्यासाठी बँकाना आदेश देण्यात यावेत. कारण बँकांकडून विनाकारण कठीण अटी लागु करुन युवकांचे कर्ज प्रकरण फेटाळण्यात येत आहे. तरी आपण योग्य ती दखल घेऊन पिंपरी चिंचवड मधील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group