पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागवले आहेत. शनिवारी दि.२० जुलै रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण समितीच्या नव्या सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांनी बुधवार दि.१७ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचा कार्यकाळ दि.९ जुलै रोजी संपुष्ठात आला आहे. त्यानुसार नव्या सदस्यांची नियुक्ती दि.२० रोजी महापालिका सभेत होणार आहे. पक्षीय संख्याबळानुसार या समितीत राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. त्यानुसार इच्छुक असणाऱ्या सदस्यांनी बुधवार दि.१७ रोजी ५ वाजेपर्यंत महापालिकेतील विरोधी पक्षनेता कार्यालयात अर्ज दाखल करावेत असे आवाहन शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group