पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर ओबीसी संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी आनंदा कुदळे यांची फेरनिवड झाली. तर त्यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिंपरीतील हॉटेल गणेश एक्झिक्युटिव्हमध्ये रविवारी (दि.१४ रोजी) ओबीसी संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी ह्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, सतिश दरेकर, हरीभाऊ तिकोणे, बंन्सी पारडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, चंद्रकांत डोके व इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत पुन्हा ओबीसी संघर्ष समितीच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी आनंदा सखाराम कुदळे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच ओबीसी संघर्ष समितीच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी विजयराव दर्शले, उपाध्यक्षपदी हनुमंत घुगे व महीला अध्यक्षपदी निलिमाताई भागवत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ओबीसी संघर्ष समितीच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी प्रा.गणेश ढाकणेसर व महिला अध्यक्षापदी नंदाताई करे यांची बिनविरोध निवड झाली. तर भोसरी विधानसभेच्या अध्यक्षपदी सोपानराव घोलप तसेच महिला अध्यक्षापदी महादेवी याला यांची बिनविरोध निवड झाली.
या सभेचे सूत्रसंचालन विशाल जाधव यांनी केले. प्रस्तावना ईश्वर कुदळे तर आभार अॅड चंद्रशेखर भुजबळ यांनी व्यक्त केले.