पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते ऋषिकेश संजोग वाघेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पिंपरीगावातील अनेक जेष्ठ मंडळींनी त्यांना शुभाशिर्वाद दिले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छाही दिल्या.
युवा नेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पिंपरी वाघेरे गावात ठिकाणी ऋषिकेश वाघेरे पाटील यांच्या हस्ते सामाजिक बांधिलकीचा वसा परंपरेनुसार सांभाळीत वृक्षारोपण करण्यात आले. भविष्याचा वेध घेत सामाजिक कर्तव्याचे भान राखीत हा स्तुत्य उपक्रम ऋषिकेशदादा वाघेरे पाटील मित्र परिवारा तर्फे राबविण्यात आला.