मुंबई (Pclive7.com):- माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर वर्णी लागली आहे. त्यांच्या सोबतीला चार कार्यकारी अध्यक्ष नेमणूक झाली आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुका बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात येणार आहेत. दरम्यान, थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून त्यांच्या सोबतीला चार कार्याध्यक्ष देण्यात आले आहेत.
स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचा युवा चेहरा असलेल्या विश्वजित कदम यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कदम यांच्यासह बसवराज पाटील, नितीन राऊत, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांचीही कार्याध्यक्षपदी वर्णी लागली आहे.