माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिले पत्र
पिंपरी (Pclive7.com):- सुनिल सुदाम भूमकर यांची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या चिंचवड विधानसभा ‘अध्यक्षपदी’ निवड करण्यात आली. निवडीचे पत्र माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले. पिंपळे गुरव येथील निळूभाऊ फुले सभागृहांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी विजय लोखंडे यांच्या सहीचे पत्र अजित पवार यांनी सुनिल भुमकर यांना दिले.
सुनिल भुमकर हे गेली अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करत आहेत. आदर्श एकता युवा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविलेले आहेत. त्यामुळे जनतेशी नाळ जोडलेला व कामाचा अनुभव असलेला, एक उच्चशिक्षित चेहरा पक्षाला मिळाला आहे. ते स्वतः नामांकित व्यावसायिक आहेत.२०१७ मध्ये त्यांच्या पत्नी यांनी राष्ट्रवादीकडून महापालिकेची निवडणूक लढवलेली आहे. तसेच नगरसेवक मयुर कलाटे यांच्यासोबत पक्ष बांधणीसाठी, पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये, मोर्चामध्ये भुमकर हे सक्रिय असतात, त्यामुळे सुनील भुमकर यांच्या रूपाने ओबीसी विभागाचे काम पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नक्कीच कौतुकास्पद असेल असे मत विजय लोखंडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळाचे गटनेते अजित पवार, ओबीसी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी भूमकर यांनी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली. तसेच पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल, असे मत सुनिल भुमकर यांनी बोलताना व्यक्त केले.