पिंपरी (Pclive7.com):- अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पिंपळे सौदागर परिसरात आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अडीच वर्षांची चिमुकली पिंपळे सौदागर परिसरात कामगार वसाहतीत राहत होती. सोमवारी चिमुकली राहत्या घरातून सायंकाळी बेपत्ता झाली. त्यानंतर घरच्यांनी परिसरात सर्वत्र तिचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील मिलिटरी परिसरातील कुंजीर चौकाजवळ आढळून आला. सांगवी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर तिच्या सोबत काही गैरप्रकार झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर येणार आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group