पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पिंपरी विधानसभा आमदार अँड. गौतम चाबुकस्वार यांच्या सहकार्याने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, जेष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींसाठी योजना, इतर योजनेचा लाभ एकाच ठिकाणी व एका दिवशी मिळणार आहे.
या उपक्रमा दरम्यान सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार असून लाभार्थी असलेल्यांचे प्रस्ताव लगेच मंजूर होणार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या योजेनचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना व युवासेना शाखा दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी-बो
या योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले आणि विभागसंघटक निलेश हाके यांनी केले. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २५ जुलै २००९ रोजी श्री विठ्ठल तरुण मंडळ वरील आळी दापोडी गावठाण सरकारी दवाखान्या जवळ होणार आहे.





















Join Our Whatsapp Group