पिंपरी (Pclive7.com):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने विविध उपक्रमांनी पिंपरी चिंचवड शहरात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेस रहटणी फाटा, काळेवाडी येथे लेबर नाक्यावर संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व सामाजिक कार्यकर्ते अरूण तांबे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून बांधकाम कामगार मजुरांचे फ्री मेडीकल चेकअप करून औषधोपचार करण्यात आला. या ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन सत्यसाई मेडीकीयर प्रोजेक्ट व शिवशाही व्यापारीसंघ बांधकाम मजुर आघाडीच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.
यावेळी मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, डॉ.मिलींदराजे भोसले, प्रदेश सचिव आशिषदादा वाळके, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष- नितीन घोलप, शिवसेना विभाग प्रमुख संजय ससाणे, नवनाथ माऊली जाधव, दत्ता गिरी, विशाल बाविस्कर, भिम वाळके, रोहीत विभुत्ते, भरत इंगळे, मारूती मस्के, तेजस दाखले, जितेंद्र दाखले, अमोल तेलंगे, अमर होफुलवार, शिवशाही व्यापारीसंघ संघ बांधकाम मजुर अघाडीचे शहराध्यक्ष दादा देडे, दत्ता कांबळे, राजु राठोड, नागनाथ माने, तानाजी कांबळे, शंभु गायकवाड, संग्राम सुर्यवंशी, लक्ष्मा देडे, रवी भिसे, गंगाधर गोटमुकले, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group