पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी येथील कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात स्वतंत्र मुख्यधापकाची नेमणूक करा, अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासेनेने शिक्षणअधिकारी पराग मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.
बोपखेल-फुगेवाडी-दापोडी-कासारवाडी ह्या सर्व शाळेचा अधिभार एका मुख्यध्यापकावर असल्या कारण्यामुळे त्यांना दोन्ही-तिन्ही ठिकाणी नीट लक्ष देता येत नाही. त्यामुळं आपल्या शाळेच्या पट वाढिवणे, गुणवत्ता वाढविणे, ह्यावर लक्ष जास्त प्रमाणात देता येत नाही. येत्या १५ दिवसात स्वतंत्र मुख्यध्यापक नेमण्यात यावा, ही मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी युवतीसेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, दक्षता समिती सदस्य रवि कोवेर, सनी कड, रवी नगरकर आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group