पिंपरी (Pclive7.com):- सत्ताधारी भाजप सरकारने राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणात कपात करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने आज निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे तसेच ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी सरकारने हा निणर्य मागे घ्यावा व जसे मागच्या २० ते २५ वर्षांसारखीच राजकीय आरक्षण प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. भाजप सरकार नेहमीच कष्टकरी, कामगार, शेतकरी, मागासवर्गीय, ओबीसी यांच्या विरोधात भूमिका घेत असते. राज्यामध्ये संख्येने ५२ टक्के असणाऱ्या ओबीसींनी येत्या विधानसभा निवडणूकीत विचारपूर्वक विचार करून पुढील काळात आपले राजकीय शैक्षणिक, व्यावसायिक आरक्षण टिकवायचे असेल तर या नाकर्त्या सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन विजय लोखंडे यांनी केले.
या आंदोलनात नगरसेविका संगीता ताम्हाणे, अनुराधा गोफणे, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, कविता खराडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, सचिन औटी, अरुणा कुंभार, शैलेश बासुतकर, बाळासाहेब पिल्लेवार, आनंदा यादव, उत्तम आल्हाट, मनोज सुतार, सतिष दरेकर, यतिन पारेख, आनंदा कुदळे, ईश्वर कुदळे, नाना धेंडे, सविता धुमाळ, हमीद शेख, बाळासाहेब जगताप, दत्तात्रय जगताप, चंद्रकांत जाधव, सुनिल भुमकर, संतोष दाढगे, चंद्रशेखर भुजबळ, देविदास गोफणे, प्रकाश आल्हाट, वसंत आल्हाट, विशाल जाधव, सतिश चोरमले, पोपट पडवळ, भरत भोसले आदी सहभागी झाले होते.