पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेत शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना थेट आव्हान दिले आहे. कलाटे यांनी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वाकड येथून त्यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिवसेना गटनेते असलेले राहुल कलाटे चिंचवडमधून तीव्र इच्छुक होते. मात्र या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात युती झाल्याने ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. भाजपाचे लक्ष्मण जगताप यांनी काल (गुरूवारी) महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलायं. यावेळी त्यांच्यासोबत अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप तसेच कलाटे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते



















Join Our Whatsapp Group