पिंपरी (Pclive7.com):- वंचित बहुजन आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शहानवाज शेख यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. भोसरी मतदारसंघात कार्यकर्त्यांची रॅली काढत त्यांनी चांगले वातावरण निर्मिती केली. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आपल्या रॅलीची सुरुवात केली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या प्रमाणात महिला आघाडीच्या कार्यकर्त्या यावेळी त्यांच्यासोबत हजर होत्या. आपण वंचित बहुजन आघाडी वतीने निवडणूक लढवीत असून, बाळासाहेबांचे विचार जनमानसात पोहोचण्याचा प्रचार माध्यमातून कार्य करणार असल्याचे यावेळी शाहनवाज शेख यांनी सांगितले. तसेच भोसरी विधानसभा मतदार संघ हा संपूर्ण महाराष्ट्रात नावाजला जाईल. याप्रकारे संपूर्ण मतदार संघाचा विकास करण्यावर माझा पुरेपूर प्रयत्न असेल. तसेच मतदारसंघातील कामगारांच्या प्रश्नांवर जास्त भर देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच मतदारसंघांमध्ये सामान्य जनतेला घरे नाहीत त्या जनतेला स्वतःची घरे मिळवून देण्याचे कामही करणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.






















Join Our Whatsapp Group