सकल मातंग समाज आणि बारा बलुतेदार समाजबांधवांचा पाठींबा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेच्या रिंगणात युवराज दाखले यांनी आव्हान निर्माण केले आहे. शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकल मातंग समाज आणि बारा बलुतेदार समाजाच्या पाठींब्यावर ते ही निवडणुक लढविणार आहेत.
निगडी येथील डॉ. हेडगेवार भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इदानी यांच्याकडे शुक्रवारी दाखले यांनी अर्ज सुपूर्द केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते.
दाखले हे शिवसेनेचे माजी पदाधिकारी असून मातंग-बहुजन समाजाचे तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे दाखले हे इतर उमेदवारांपुढे आव्हान उभे करू शकतात असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group