पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून माणूस खरा शब्दांचा, लाख लाख हृदयांचा हे आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी बनविण्यात आलेले व्हिडिओ गीत सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. भोसरी मतदारसंघातील प्रत्येकाच्या ओठांवर हे गीत आहे.
विधानसभा निवडणुक प्रचारासाठी आमदार महेश लांडगे यांच्या टीमने विविध प्रकारचे फंडे शोधून काढले आहेत. आमदार लांडगे यांच्या प्रचारासाठी बनविण्यात आलेले प्रचारगीत चांगलेच लोकप्रिय ठरले आहे.
‘‘माणूस खरा शब्दांचा
लाख लाख हृदयांचा
जनामनांच्या मनामनातून
आम्ही करतो वादा
दुजा नाही कोणी येथे
आमचे महेशदादा, पुन्हा महेशदादा’’
यूट्यूबवर https://youtu.be/AcB_VttzJ4Y आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी बनविण्यात आलेले व्हिडिओ गीत पाहण्यास मिळत आहे.
अशी सुरुवात असलेले हे गीत मतदारांच्या मनात रुंजी घालत आहे. या व्हिडिओ गीतात विकासाशी नाते सांगणारे आमदार महेश लांडगे कधी विकास कामांची उद्घाटने, भूमीपूजने करताना दिसतात. तर कधी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जनमानसात मिसळताना दिसतात. तर कधी ढोलही वाजवताना दिसतात. आमदार महेश लांडगे यांनी निवडून आल्यापासून सोडविलेल्या प्रलंबित प्रश्नांचा वेध या गीतात घेण्यात आला आहे. बफर झोन, वेस्ट टू एनर्जी, आंद्रा-भामा-आसखेड, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, संतपीठ अशा अनेक विकास कामांचा उल्लेख यात करण्यात आला आहे. व्हिजन 20-20 अंतर्गत परिवर्तन हे घडते आहे असे सांगत असतानाच भविष्यात राहिलेले प्रश्न सोडविण्याचा निर्धार या व्हिडिओ गीतात व्यक्त करण्यात आला आहे. जरी पटावर लाखो प्यादे, आमचा एकच राजा असे सांगत आमदार लांडगे यांच्याविषयी आबाल वृद्धांमध्ये असलेली आपुलकी, प्रेमाची भावना या व्हिडिओ गीतात सुंदर शब्दात व्यक्त करण्यात आली आहे.
माणूस खरा शब्दांचा, लाख लाख हृदयांचा महेश लांडगे यांचे प्रचार गीत भोसरीकरांच्या ओठावर..!






















Join Our Whatsapp Group