पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्या झंझावाती प्रचारदौऱ्याने मंगळवारी चिंचवड अक्षरशः ‘राहुलमय’ होऊन गेला. राहुलदादांचे उत्स्फूर्त स्वागत होण्याबरोबरच त्यांना अधिकाधिक मताधिक्य मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रभागांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कलाटे यांच्या प्रचारदौऱ्याला वाकड येथून सुरूवात झाली. तर सर्व फ्लोरींका सोसायटी, कस्यप सोसायटी, समस्त गावकरी मंडळ रहाटणी, छावा मराठा युवा महासंघ, पिंपरी चिंचवड शहर याठिकाणी त्यांचा दौरा झाला. त्या ठिकाणी औक्षणासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. राहुल कलाटे यांनी गेल्या १५ वर्षाच्या सामाजिक व राजकीय जिवनात विविध विकासकामे मार्गी लावण्यात ते यशस्वी झाले अाहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांचा नाव लौकिक पाहण्यास मिळत आहे. यंदा आमदार नवा फक्त राहुल राहुलदादाच हवा अश्या माध्यमातून कार्यकर्ते राहुलदादांचा प्रचार करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group