पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ दिग्गज अभिनेते खासदार सनी देओल यांची भव्य पदयात्रा आज मंगळवार (दि.१५) रोजी काळेवाडी परिसरात आयोजित करण्यात आली आहे.
अवघ्या सात दिवसांवर निवडणूक घेऊन ठेपली आहे. सर्वत्र प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे आदी मोठ्या नेत्यांच्या सभा यापूर्वी झाल्या आहेत. दरम्यान आज अभिनेते भाजपाचे खासदार सनी देओल हे लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मैदानात उतरणार आहेत. सनी देओल यांची आज मंगळवारी (दि.१५) रोजी सायंकाळी ४ वाजता काळेवाडी परिसरात भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. काळेवाडी-पिंपरी पूल पवनानगर येथून या पदयात्रेची सुरुवात होणार असून परिसरातील भाजपाच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group