पिंपरी (Pclive7.com):- युवासेना पिंपरी विधानसभेने गेल्या सहा महिन्यापासून सामान्य जनतेला मदत करण्यासाठी युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात व जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे यांच्या मार्गदर्शना खाली केलेले आंदोलन, उपोषण, भ्रष्टाचार विरोधात वेळोवेळी आवाज उठविणे, सामाजिक कार्य, ह्या सर्व गोष्टीचा कार्यअहवालाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
महायुतीचे उमेदवार आमदार गौतम चाबुकस्वार ह्यांच्या प्रचार सभेला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आले होते. ह्यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेत्या नीलमताई गोरे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, रघुनाथ कुचीक, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे कामगार नेते इरफान सय्यद,शहरप्रमुख योगेश बाबर पिंपरी संपर्क प्रमुख गिरीश सावंत, नगरसेविका मीनल ताई यादव, अश्विनीताई चिंचवडे, अमितदादा गावडे, प्रमोद कुटे, युवासेना जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे, युवासेना मावळ तालुका प्रमुख अनिकेतभाऊ घुले उपस्थित होते. अहवाल प्रकाशनचे नियोजन युवती अधिकारी प्रतिक्षाताई घुले व विभागसंघटक निलेश हाके यांनी केले.






















Join Our Whatsapp Group