पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शिवतेजनगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानने दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी पहाट २०१९ सुगम संगीत, भक्ती संगीत, व भाव गीताचा सुरेल कार्यक्रम सुरशी संगीत साधक संस्था प्रस्तुत सुरेल पहाटचे आयोजन केले होते.
यामध्ये मराठी गाणी, हिंदी गाणे, भाव गीत, भजन हे गाईले. या कार्यक्रमाला परिसरातील लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सादरकर्ते निवृत्ती धाबेकर गुरुजी (संगीत अलंकार), दिगंबर राणे, अरुणा देवगावकर, अजित घोरपडे, रुपेश सुतार, मधुर ठाकूर, सतीश यादव, शुभम घेवारे, श्रावणी मुळीक, रेणू इटकर, सुषमा साळुंखे, वासंतीका कांबळे हे होते. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा.हरिनारायण शेळके, मंगेश पाटील, भारत शेंगडे, अर्चना तोंडकर, अंजली देव, सारिका रिकामे, अक्षदा देशपांडे, कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक राजाराम सावंत यांनी केले.





















Join Our Whatsapp Group