पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती व विकास योजना विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उद्या दि. २७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर येथे शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे, तर महापौर उषा उर्फ माई ढोरे या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे व खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती राहणार असून खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या सुलक्षणा धर-शिलवंत, सुजाता पलांडे, नगरसदस्य शाम लांडे, योगेश बहल, स्वीकृत नगरसदस्य माऊली थोरात तसेच सर्व नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. तरी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.