पिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठांना वयाबरोबर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु त्यावर मात करून “ज्येष्ठांनी आनंद जीवन जगावे” असे प्रतिपादन पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले. आकुर्डी येथील आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नगरसेवक जावेद शेख यांच्या सहकार्याने १६९ जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पासेसचे वितरण आमदार अण्णा बनसोडे व नगरसेवक जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की ज्येष्ठांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत सहलीचे नियोजन करून या पासेसचा पूर्ण सदुपयोग करून आनंद लुटावा. याच कार्यक्रमात हृदयरोग तज्ञ डॉक्टर विशाल पाटील यांनी हृदयरोग व त्यासंदर्भातील काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी स्टार हॉस्पिटल आकुर्डीचे प्रशासन अधिकारी सुभाष वाघ व दीपक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाने केले होते.